भारताची खोडी काढणे पाकिस्तानला महागात पडणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2020
Total Views |


pakistan_1  H x



न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायम प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी सोशल मीडियावर भारताविरूद्ध बनावट व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानकडून वारंवार अशा खोड्या काढल्या जात आहेत. त्यांच्या जुन्या सवयी कधीच जाणार नाही. तर दुसरीकडे, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनीही पाकिस्तानवर रोष व्यक्त केला आहे. ते म्हणाले, बनावट ट्विट करा, पकडले जा,हटवा, पुन्हा तेच करा. पाकिस्तान वारंवार भारताविरुद्ध कट रचण्याची कामे करतो. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी रात्री उशिरा बांगलादेशात सात वर्षापूर्वी झालेल्या हिंसाचाराचा एक व्हिडिओ ट्वीट करून दावा केला होता की भारतीय पोलिसांनी यूपीमधील मुस्लिमांवर अत्याचार केले आहेत. परंतु, जेव्हा हे ट्विट खोटे असल्याचे उघडकीस आले तेव्हा त्यांनी हे ट्विट काढून टाकले.


खरे तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी ननकाना साहिब गुरुद्वारावर जमावाकडून झालेल्या हल्ल्याच्या घटनेपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी
'भारतातील मुस्लिमांवर पोलिसांवर अत्याचार' असल्याचा दावा करणारे अनेक व्हिडिओ पोस्ट केले.





बांगलादेशातील जवळपास सात वर्षांपूर्वीचा व्हिडिओ ट्विट करून इम्रानने दावा केला की, भारतीय पोलिस मुस्लिमांवर अत्याचार करत आहेत. तथापि, जेव्हा इमरान सोशल मीडियावर टाकलेला व्हिडीओ खोटा असल्याचे कळले तेव्हा त्यांनी हा व्हिडिओ काढून घेतला. त्याचबरोबर, यूपी पोलिसांनीही ट्विट करून हे व्हिडीओ यूपीचे नसल्याचे स्पष्ट केले. यूपी पोलिसांनी ट्विट केले आहे की, हे यूपीमधील नसून मे २०१३ मधील बांगलादेशची राजधानी ढाका येथील घटनेची आहे.


व्हिडिओमध्ये इमरान खान यांनी व्हिडिओतील जी यूपी पोलिसाविषयी माहिती दिली आहे
, त्यांच्या वर्दीवर ठळकपणे आरएबी लिहिलेली दिसते. आरएबी (रॅपीड क्शनक्शन बटालियन) हे बांग्लादेश पोलिसांचे दहशतवादी विरोधी पथक आहे. इमरानने ट्वीट केलेला व्हिडिओशी समान व्हिडिओ १० सप्टेंबर २०१३रोजी यू-ट्यूबवर अपलोड केले गेले. व्हिडिओविषयी प्रतिक्रिया देताना त्यात लिहिले आहे की हिफाजत-ए-इस्लाम रॅलीवर बांग्लादेशी पोलिसने कारवाई केली आहे.

@@AUTHORINFO_V1@@