निर्भया दोषींना फाशी उद्याच ? आज निकाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jan-2020
Total Views |

nirbhaya_1  H x





नवी दिल्ली : निर्भया प्रकरणातील दोषींना फाशी देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती तिहार जेल प्रशासनाने आज न्यायालयात दिली. परंतु, पतियाळा हाऊस न्यायालयात फाशी पुढे ढकलण्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली असून, त्यावर सुनावणी सुरू आहे.


दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टात तिहार कारागृह प्रशासनाने म्हटले आहे की, १ फेब्रुवारी रोजी निर्भयाच्या तीन दोषींना फाशी देण्याची त्यांच्या बाजूने तयारी आहे. तिहार कारागृहाचे प्रतिनिधित्व करणारे सरकारी वकील इरफान अहमद म्हणाले की, केवळ एक दोषी विनय शर्माची दया याचिका प्रलंबित आहे आणि इतरांना फाशी दिली जाऊ शकते. ते म्हणाले की, हे कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर नाही. त्याचबरोबर कोर्टाने या प्रकरणातील निर्णय राखून ठेवला आहे. आज हा निकाल दिला जाईल अशी आशा आहे.



याचिकेवर सुनावणी सुरू असताना दोन्ही पक्षांच्या वकिलांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. या प्रकारावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. निर्भया प्रकरणातील दोषी मुकेश सिंह यांच्या वकील वृंदा ग्रोवर न्यायालयात उपस्थित राहिल्याबद्दल वकिलांनी आक्षेप घेतला. यावरून वकिलांमध्ये वाद झाला.


... फाशी देणे लांबणीवर जाऊ शकते


नियमांनुसार, जर एखाद्या प्रकरणात एकापेक्षा जास्त दोषींना फाशी द्यायची असेल तर एखाद्याची याचिकेवर निर्णय होईपर्यंत सर्वांची फाशी प्रलंबित राहील. निर्भया प्रकरणही असेच असून चार दोषींना फाशी सुनाविण्यात आली आहे. १ फेब्रुवारीला फाशी देणे अशक्य आहे कारण कोणत्याही दोषीला फाशी देण्याच्या १४ दिवस आधी सांगणे आवश्यक आहे. मुकेश सिंगचे सर्व पर्याय संपले आहेत, तर विनय शर्मा यांची दया याचिका अद्याप प्रलंबित आहे. त्याचवेळी अक्षयसिंग यांच्याकडे दया याचिका करण्याचा पर्याय आहे. तर पवन गुप्ता यांच्याकडे सुधारणा व दया याचिका दोन्ही पर्याय आहेत.


दोषींवर दरोडे व अपहरण केल्याचा गुन्हा


दोषींचे वकील एपी सिंग यांनी नुकतीच पटियाला हाऊस कोर्टात सांगितले होते की, पवन, मुकेश, अक्षय आणि विनय यांना कोर्टाने चोरी व लुटमारीच्या प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयाच्या विरोधात अपील उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. जोपर्यंत यावर निर्णय येत नाही तोपर्यंत दोषींना फाशी देता येणार नाही.
@@AUTHORINFO_V1@@