उर्मिला बरळली; म्हणे सीएए हा रौलट कायदा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jan-2020
Total Views |
Urmila-Matondkar_1 &
 

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला केला विरोध



पुणे : उर्मिला मातोंडकर यांनी नागरिकत्व कायद्याला विरोध करताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आता तीव्र पडसाद उमटत आहेत. नागरिकत्व कायद्याची तुलना रौलट कायद्याशी केली आहे. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी हिंदूत्वावरही टीका केली आहे.
 
त्या म्हणाल्या, "१९१९ साली रौलट कायदा आला होता, आता २०१९ साली आलेला नागरिकत्व संशोधन कायदा हा त्याचीच आठवण म्हणून लक्षात राहील. धर्माच्या आधारावर नागरिकांची ओळख केली जात असून हा कायदा मुस्लीम विरोधी आहे. संविधानात तुम्ही धर्म, लिंग, क्षेत्र या आधारावर ओळख सांगू शकत नाही."
 

महात्मा गांधी हिंदूत्वाचे अनुयायी !
 
महात्मा गांधी हे हिंदूत्ववादाचे खरे अनुयायी होते, ज्यांनी त्यांना गोळी मारली तो हिंदूच होता. आम्ही नागरिकत्व संशोधन विधेयकाचा स्वीकार करणार नाही. उर्मिला यांच्या या वक्तव्यावरून आता प्रतिक्रीया येऊ लागल्या आहेत.





@@AUTHORINFO_V1@@