'सीएए'साठी मोदी सरकारला सलाम !
हैदराबाद : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे राष्ट्रीय उर्दू विद्यालयचे कुलगुरू फिरोझ बख्त अहमद यांनी समर्थन केले आहे. सत्तेसाठी विरोधक याचा अपप्रचार करून फायदा घेऊ पाहत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. सीएए आणि एनआरसी या दोन भिन्न गोष्टी असताना चुकीची माहिती नागरिकांना दिली जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या प्रकारामागे विरोधी पक्षातील नेतेमंडळी आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात हा कायदा पारित झाला त्याबद्दल त्यांनी समर्थन केले. पाकिस्तानसह इतर राष्ट्रातील अल्पसंख्यांकांचा छळ केला जात आहे, त्यामुळे त्यांना भारतात न्याय मिळू शकेल. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या निदर्शनात नागरिकत्व संशोधन विधेयकाबद्दल चुकीची माहिती दिली जात आहे. सीएए आणि एनआरसी या दोन भिन्न गोष्टींना एकत्र आणले जात आहे. सरकारने वारंवार याबद्दल स्पष्टीकरण दिल्यानंतरही याला विरोध होत आहे.