कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याचे वित्त मंत्रालयाकडून कौतुक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jan-2020
Total Views |

budget _1  H x



नवी दिल्ली
: वित्त मंत्रालयाने ट्विट करून अधिकारी कुलदीप कुमार शर्मा यांचे कौतुक केले आहे. यामागचे कारण असे की वडिलांच्या निधनानंतरही त्यांच्या अंत्यदर्शनाला न जाता त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे काम सुरू केले. २६जानेवारी रोजी त्याच्या वडिलांचे निधन झाले. कुलदीप शर्मा वित्त मंत्रालयाच्या प्रेसमधील उपव्यवस्थापक आहेत. अर्थसंकल्प सादर होईपर्यंत अर्थसंकल्प प्रक्रियेशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना  बाहेर जाता येत नाही.



शनिवारी संसदेमध्ये देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यानंतरच कुलदीप शर्मा बाहेर पडू शकणार आहेत. बजेट बनविण्याची प्रक्रिया सहसा सप्टेंबरपासून सुरू होते. जेके काम सहा महिने चालते. त्याच बरोबर, अंदाजपत्रकाची कागदपत्रे छापण्याची प्रक्रिया हलवा सोहळ्यापासून सुरू होते. हलवा समारंभानंतर अर्थसंकल्प प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी वित्त मंत्रालयात राहतात.






या ट्वीटमध्ये अर्थ मंत्रालयाने लिहिले आहे की, ‘कुलदीप कुमार शर्मा, उपव्यवस्थापक (प्रेस)यांच्या वडिलांचे २६ जानेवारी२०२० रोजी निधन झाले. बजेट ड्युटीवर असल्याकारणाने ते बाहेर जाऊ शकले नाही. वडिलांना गमावून देखील शर्मा यांनी एक मिनिटदेखील प्रेसचे क्षेत्र न सोडण्याचा निर्णय घेतला. आम्ही सर्व त्यांच्या दुखाःत शामिल आहोत.’




मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, 'शर्मा यांना अर्थसंकल्प प्रक्रियेचा ३१ वर्षांचा अनुभव आहे. या कारणास्तव, बजेटच्या कागदपत्रांची छपाई फारच कमी वेळात पूर्ण करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अनुकरणीय वचनबद्धता दर्शवित शर्मा यांनी वैयक्तिक नुकसानाकडे दुर्लक्ष्य करून आपल्या कर्तव्याबद्दल प्रामाणिकपणा दर्शविला. याबद्दल त्यांचे कौतुक.’ यावर्षी २० जानेवारी रोजी हलवा सोहळा पार पडला. हलवा सोहळ्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी वित्त मंत्रालयात राहतात. अर्थसंकल्प सादर होण्याच्या दोन दिवस आधी अर्थ मंत्रालय सील केले जाते. संसदेत अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच त्याच्या प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी बाहेर जाऊ शकतात.
@@AUTHORINFO_V1@@