चीनच्या हुबे विद्यापीठात २७ भारतीय अडकले, ७ महाराष्ट्रीयन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2020
Total Views |


corona virus_1  



पुणे : चीनमधील धोकादायक कोरोना व्हायरसने अमेरिकेसह अनेक देशांना घेरले आहे. या कोरोना व्हायरसचा फटका चीनमध्ये शिकणाऱ्या २७ भारतीय विद्यार्थ्यांनाही बसला आहे. यात पुणे, गडचिरोलीसह महाराष्ट्रातील ७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.


हे सर्व विद्यार्थी चीनच्या हुआन शहरापासून ९० किलोमीटर अंतरावर सीयानीग गावात हुबे ‘युनिवर्सिटी ऑफ सायंस अँड टेक्नोलॉजी’मध्ये एमबीबीएस शिकत आहेत. या गावात गेल्या एक आठवड्यापासून कोरोना व्हायरसचा प्रभाव व धोका वाढला आहे. त्यामुळे विद्यापीठाने २७ भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर निघण्यास मनाई केली आहे. त्यांना तेथून बाहेर पडता येत नसल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचीही कमतरता भासू लागली आहे.


येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सलोमी त्रिभुवन (पुणे), जयदीप देवकाते (पिंपरी-चिचवड), आशिष गुरमे (लातूर), प्राची भालेराव (यवतमाळ), भाग्यश्री उके (भद्रावती), सोनाली भोयर (गडचिरोली), कोमल जल्देवार (नांदेड) यांचा समावेश आहे. अडकलेल्या सातही जणांनी घरच्यांशी संपर्क साधला आहे. त्याचप्रमाणे जयदीप देवकाते या विद्यार्थ्याने व्हिडीओ शेअर करत भारतीय दूतावासाशी संपर्क साधून मदतीची मागणी केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@