शिवसेना खासदारासमोर महिलांनी घेतल्या नदीत उड्या

    दिनांक  03-Jan-2020 16:58:49
|
Dhairyashil mane Kolhapur
 
 

कोल्हापूर पूरग्रस्तांना अद्याप न्याय मिळेना !


कोल्हापूर : कोल्हापुरातील पूरग्रस्तांना अद्याप मदत न मिळाल्याने तीन दिवसांपासून स्थानिक महिलांनी पंचगंगा नदीत आंदोलन सुरू केले आहे. त्याच्याकडील 'मायक्रोफायनान्स'चे कर्ज माफ व्हावे यासाठी हे आंदोलन सुरू आहे. मात्र, शासनाने दखल न घेतल्याने हे आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आहे. शिवसेना खासदार यांनी आंदोलक महिलांचे निवेदन स्वीकारण्यासाठी शुक्रवारी त्यांची भेट घेतली होती.

 

शिवसेना खासदार धैर्यशील माने आल्यानंतर आंदोलक महिलांनी त्यांच्यासमोर पंचगंगा नदीत उड्या घेतल्या. छत्रपती शासन संघटनेच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले आहे. खासदार धैर्यशील माने यांच्यासमोर महिलांनी नदीत उड्या घेतल्या त्यामुळे उपस्थित पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी पाण्यात उतरुन या महिलांना बाहेर काढले. धैर्यशील माने स्वतः पाण्यात उतरून आंदोलक महिलांना बाहेर येण्याचे आवाहन करत होते.

 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.