जळगावात फुलले 'कमळ' ; खडसे- महाजन रणनीती यशस्वी

03 Jan 2020 17:11:11


asf_1  H x W: 0

 


जळगाव : जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांची रणनीती यशस्वी झाली. भाजपने महाविकास आघाडीला सुरुंग लावत जिल्हा परिषदेत 'कमळ' फुलवले आहे. अध्यक्षपदी रंजना पाटील तर उपाध्यक्षपदी लालचंद पाटील विजयी झाले आहेत. जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी शुक्रवारी दुपारी निवडणूक प्रक्रिया पार पडली.

 

गेल्या दोन दिवसात राजकीय हालचाली वेग आला होता. या निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप व विरोधी महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. माजी मंत्री एकनाथ खडसे व आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही निवडणूक लढवली. शेवटच्या क्षणी भाजपची फत्ते होऊन अध्यक्षपदी रंजना पाटील तर उपाध्यक्षपदी लालचंद पाटील यांची निवड झाली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

Powered By Sangraha 9.0