ईराणच्या राष्ट्रपतींहून लोकप्रिय होते जनरल कासिम !

    दिनांक  03-Jan-2020 18:27:09
|
IRAN _1  H x W:
 


युद्ध तुम्ही सुरू केले तर आम्हीच संपवू : ट्रम्प यांना दिला होता इशारा


तेहरान : राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार गुरुवारी रात्री उशीरा कासीम सुलेमानींना ठार केले. जनरल कासीम सुलेमानी इराक आणि सिरीयामध्ये दहशतवादी संघटनांशी लढण्यासाठी चर्चित होते. गतवर्षात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अणवस्त्र हल्ल्याची धमकी दिली होती. त्यावेळी कासीम यांनीच त्यांना उत्तर दिले होते. 'तुम्ही युद्ध सुरू केले तर आम्ही संपवू', असा इशारा त्यांना दिला होता.

 

२०१८मध्ये एका पोलींग एजन्सीने अमेरिकेच्या मॅरीलॅण्ड विद्यापीठासोबत एक सर्वेक्षण केले होते. त्यात जनरल कासिम यांची लोकप्रियता ८३ टक्क्यांवर होती. ईराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानीं आणि परराष्ट्रमंत्री जावेद जरीफ यांच्यापेक्षा जास्त होती. त्यांना राष्ट्रपतीपदासाठीचे उमेदवार मानले जात होते. मात्र, त्यांनी याला नकार दिला होता.

 

अमेरिकेने गेल्यावर्षी एप्रिलमध्ये ईराण रिवॉल्युशन्स गार्ड आणि सैन्यावर प्रतिबंध घातले. १५ एप्रिलपासून त्यांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते. त्यांच्यावर अमेरिकेने दहशतवाद पसरवण्याचा आरोप केला होता. गेल्या काही काळात भारत, जर्मन, बोस्निया, बग्लेरिया, केनिया, बहरिन आणि तुर्की आदी देशांत दहशतवादी कारवायांचा खुलासा करण्यात आला होता. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, २००३ ते २०११ पर्यंत जनरल कासिम यांच्यामुळे इराकमुळे ६०३ सैनिक मारले गेले. शिया विद्रोहींसाठी बॉब्म तयार करण्यासाठी कासीम कित्येक नागरिकांच्या मृत्यूसाठी जबाबदार आहे.
 

इस्त्रायली सैन्य हाय अलर्टवर

जनरल कासीमच्या मृत्यूनंतर इस्त्रायली सैन्य हाय अलर्टवर आहे. इस्त्रायलने ईराणी सैन्य युद्ध पुकारू शकते, अशी शक्यता इस्त्रायलने व्यक्त केली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनीही आपल्या ग्रीस दौऱ्याहून परत येण्याचा निर्णय घेतला आहे. सिरीया सरकारने कासिमचा मृत्यू ही अमेरिकेची दगाबाजी असल्याचे म्हटले आहे. रशियानेही या घटनेला अमेरिकेचे तणावपूर्ण पाऊल म्हटले आहे.

 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.