ट्रॅफिकमध्ये अडकलायत? मग वडापाव खा आणि एन्जॉय करा!

03 Jan 2020 18:32:29

vadapav_1  H x


तुम्ही प्रवासात आहात, बस-स्टँण्ड मध्ये गाडी थांबली, कळकट-मळकट कपडयातला पोऱ्या, थंडगार वडा आणि पाव घेऊन वड्डा पाssssव.....असं ओरडत येतो आणि रद्दी कागदात घाणेरड्या हाताने गुंडाळून मिरची सहित देतो ! गरज असली की घेतातही लोक... पण तेच तुम्ही ट्रॅफिक सिग्नलवर स्वच्छ कपड्यातली मुले, एक बॉक्समधून गरम वडा, एक ताजा पाव, टिश्यू पेपर, छोटी पाणी बॉटल व्यवस्थित पॅक करून फक्त २० रुपयांना विकतात... कोणतं पार्सल आवर्जून घ्याल?? उत्तर असेल नक्कीच दुसरं...


यशस्वी लोक वेगवेगळ्या गोष्टी करत नाहीत
, ते फक्त भिन्न गोष्टी करतात! ट्रॅफिक जामने भरलेल्या तीन हाथ नाका सिग्नलवरील हे जिवंत उदाहरण पहा.

vadapav_1  H x



गौरव लोंढे या मराठमोळ्या मुलाच्या डोक्यातून निघालेली ‘
ट्रॅफिक वडा पाव’ ही भन्नाट कल्पना


vadapav_1  H x



ट्रॅफिक वडा पाव’ या ब्रॅण्डखाली त्यांची सहा जणांची टीम जोरदार पणे ठाणे (पश्चिम) तीन हात नाका येथे ही भन्नाट कल्पना राबवते.

vadapav_1  H x


गौरव आणि त्याच्या या भन्नाट कल्पनेचं सध्या सगळ्यांकडून कौतुक होत आहे. 


vadapav_1  H x

Powered By Sangraha 9.0