निर्भया दोषी मुकेशची याचिका फेटाळली ; फाशीचा मार्ग मोकळा

29 Jan 2020 11:25:40

mukesh singh_1  



नवी दिल्ली
: दिल्लीतील निर्भया प्रकरणातील दोषी मुकेश कुमार सिंह याचिका आज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. राष्ट्रपतींच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करीत मुकेशने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावल्याने आता दोषी मुकेशच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे. याआधी राष्ट्रपतींनी मुकेशची दया याचिका फेटाळून लावली होती. याविरोधात मुकेशने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.



निर्भया प्रकरणातील चार आरोपींपैकी एक आरोपी मुकेश आहे. त्याने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. परंतु, राष्ट्रपतींनी त्याची दया याचिका फेटाळून लावली होती. राष्ट्रपतींनी ही याचिका का फेटाळली याचा न्यायिक तपास करण्यात यावा, अशी मागणी करीत मुकेशने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मंगळवारी मुकेशकडून वकील अंजना प्रकाश यांनी ही याचिका दाखल केली होती. राष्ट्रपतींसमोर सर्व कागदपत्रे आली नाही. दया याचिका फेटाळण्यात घाई करण्यात आली असा दावा मुकेशने याचिकेतून केला होता. त्याविरोधात त्याने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. दरम्यान १ फेब्रुवारी रोजी निर्भया दोषींना फाशी देण्यात येणार आहे. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता चौघांनाही फाशी देण्यात येणार असून फाशी टाळण्यासाठी दोषींची विविध मार्गांनी धडपड सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0