मुंबईत रेलरोको ; बंदला संमिश्र प्रतिसाद

    दिनांक  29-Jan-2020 10:46:51

saf_1  H x W: 0
 
 
मुंबई : देशभर सीई आणि एनआरसी विरोधात बहुजन क्रांती मोर्चाने भारत बंदची हाक दिली. मात्र, या बंदला देशभरात चांगला प्रतिसाद मिळाला नाही. मुंबईमध्ये बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग स्थानकात रेल रोको केला. यामुळे ध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला. या रेल रोकोमुळे सीएसटीएमकडे जाणारी लोकल वाहतूक सुमारे २० मिनिटे उशिराने धावत होती. गर्दीच्या वेळेस हा प्रकार घडल्याने प्रवाशांनी आक्षेप नोंदवला.
 
मध्य रेल्वेवरील कांजूरमार्ग स्थानकात बुधवारी सकाळच्या सुमारास बहुजन क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते रेल्वे रुळांवर उतरले. त्यांनी एसएमटीकडे जाणारी धीम्या मार्गावरील लोकल रोखून धरली. ऐन गर्दीच्या वेळी रेल रोको झाल्यामुळे चाकरमान्यांची तारांबळ उडाली. बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा हा रेल रोको अर्धातास सुरु होता. यावेळी रेल्वे पोलिसांनी वेळेवर कारवाई करत आंदोलकांना दूर केले. नंतर मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली.