... म्हणून आता तोलून मापून बोलतो : अजित पवार

29 Jan 2020 15:38:41
A
ajit pawar_1  H
 
अमरावती : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे रोखठोक बोलण्यामुळे महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या स्वभावामुळे ते अनेकदा अडचणीत आले आहेत. त्यामुळे आता ते बोलताना अत्यंत काळजीपूर्वक बोलतात. याब्ब्दल स्वतः अजित पवार सांगतात की, "अनेकदा ध चा मा केला जातो. त्यामुळे मी आता काहीही बोलण्याच्या आधी पन्नास वेळा विचार करतो. शंका-कुशंका निर्माण होणार नाही, वाद निर्माण होणार नाही हे लक्षात घेऊन सर्व गोष्टी तोलूनमापून बोलाव्या लागतात." असे ते म्हणाले.
 
अमरावतीमध्ये पत्रकारांशी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सरकारमधून बाहेर पडण्याविषयी जे वक्तव्य त्यावर विचारण्यात आले. त्यावर त्यांनी अशोक चव्हाणांना टोला लगावत सांगितले की, "बाकीच्यांनी बोलून काहीही उपयोग नाही. राज्याच्या हितासाठी आम्ही किमान समान कार्यक्रमावर काम करण्याचे ठरवले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा पाठिंबा आहे तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही."
Powered By Sangraha 9.0