मोदींनंतर आता मॅन वर्सेज वाईल्डमध्ये रजनिकांत

28 Jan 2020 14:33:19
Man-VS-Wild _1  



कर्नाटकच्या बांदीपूर जंगलात होणार चित्रिकरण


नवी दिल्‍ली : सुपरस्टार रजनीकांत आता मेन वर्सेज वाईल्ड या बेअर ग्रिल्ससोबत दिसणार आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा एपिसोड प्रचंड गाजला होता. या यशानंतर बेअर ग्रिल्स पुन्हा एकदा नव्या चित्रिकरणासाठी भारतात दाखल झाला आहे. रजनीकांत आणि बेअर ग्रिल्सची रोमांचकारी सफर बांदीपूरच्या जंगलात होणार आहे.

 

गतवर्षी १२ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या मॅन वर्सेज वाइल्डच्या एपिसोडणध्ये मोदी बेअरसोबत उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट जंगलात गेले होते. हा एपिसोड प्रचंड गाजला होता. बेअर ग्रिल्स मंगळवारी भारतात दाखल झाला. लवकरच या कार्यक्रमाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे.







Powered By Sangraha 9.0