मार्चमध्ये म्हाडाच्या ९ हजार घरांची सोडत

    28-Jan-2020
Total Views |
MHADA _1  H x W

घरांचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खुशखबर


मुंबई : म्हाडा कोकण मंडळाची सुमारे ९ हजार २०० घरांच्या सोडतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या घरांसाठी सोडत निघणार आहे. या सोडतीमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या बहुतांश घरांचा समावेश असल्याने सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या किंमतीत हक्काचे घर मिळणार आहे. या सोडतीमध्ये कोकण मंडळाच्या हद्दीतील भंडार्ली, माणकोली- भिवंडी, घणसोली, वसई, शिरढोण, खोणी आदी भागांतील घरांचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे खासगी विकासकांकडून म्हाडाला मिळणाऱ्या २० टक्के कोट्यातील घरांचाही या सोडतीमध्ये समावेश असेल. तसेच काही विखुरलेली घरेही यात समाविष्ट आहेत. त्यामुळे हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीची जाहिरात लवकरच काढण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. त्यानंतर महिनाभरात सोडत काढण्यात येईल.अशी माहिती कोकण मंडळाचे मुख्यधिकारी माधव कुसेकर यांनी दिली. 
उपलब्ध घरे
- शिरढोण - पाच हजार
- खोणी - भंडार्ली - एक हजार १३६
- माणकोली (भिवंडी) -२६८
- घणसोली - ४०
- वसई - १५