शाहिनबागच्या धर्तीवर नागपाड्यात आंदोलन : स्थानिक वेठीस

    दिनांक  28-Jan-2020 10:26:56
Nagpada-Mumbai _1 &n
 

पोलीसांकडून आंदोलन मागे घेण्याची मागणी

 
 
मुंबई : नागपाडा येथे सुरू असलेल्या सीएए आणि एनआरसी विरोधातील आंदोलनामुळे स्थानिक वेठीस धरले जात असून पोलीसांनी हे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. आंदोलनकर्त्यांनी मात्र, आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम असून आंदोलन मागे घेणार नाही, असे स्पष्ट केले आहे. आंदोलनाचा मंगळवारी दुसरा दिवस आहे.
 
नागपाडा, मुंबईतील मुस्लीम बहुलभागात इथल्या महिलांनी सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन सुरू केलेले आहे. हा कायदा मागे घेण्यात यावा यासाठी त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला आहे. मात्र, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे नागरिकांना दैनंदिन व्यवहारांत अडथळा येत असल्याचे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे.
 
रुग्णवाहिका, शाळा महाविद्यालयांत जाणारे विद्यार्थी आणि इतर स्थानिकांना या ठिकाणांहून वाहतूकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. तसेच या कारणामुळे वाहतूक कोंडी सहन करावी लागत आहे. पोलीसांनी महिला आंदोलकांना दुसऱ्या ठिकाणी आंदोलनाची परवानगी काढून यावर तोडगा निघू शकतो, असे आवाहनही त्यांनी केले आहे.