आदित्य ठाकरेंच्या 'नाईट लाईफ' पहिल्याच दिवशी फ्लॉप

    दिनांक  27-Jan-2020 10:45:30

asf_1  H x W: 0

 


मुंबईच्या रस्त्यांवर शुकशुकाटच...


मुंबई : शिवसेना आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा महत्वाचा मुंबई २४ तास म्हणजेच नाईट लाईफचा प्रयोग फसल्याचे २६ तारखेच्या रात्री दिसून आले. अनेक ठिकाणी मॉल्स, मिल कंपाऊंडमधील रेस्टॉरंट बंद ठेवण्यात आले होते. तर गिरगाव चौपाटीसह इतर सहा ते सात ठिकाणी फूड ट्रक्स आणि रात्रभर खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात येणार होती. मात्र, २६ जानेवारीच्या रात्री गिरगाव चौपाटी पूर्णत: शांतच होती. मरिन ड्राईव्हवर नेहमीप्रमाणे लोकांची गर्दी होती. परंतु, रात्री दीड-दोननंतर पोलिसांनी नेहमीप्रमाणे येथील गर्दी हटवली. त्यामुळे अनेकांच्या उत्साहावर विरजण पडले.

 

नव्या राज्य मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वीच नाईट लाईफ योजनेला हिरवा कंदील दिला होता. त्यामुळे २६ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून मुंबईच्या अनिवासी भागातील मॉल्स, हॉटेल आणि दुकाने रात्रीच्यावेळी सुरु ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु, पहिल्याच दिवशी त्याला चांगला प्रतिसाद न मिळाल्याने मुंबईकरांनी निराशा व्यक्त केली. मॉल्स, मिल कंपाऊंडमधील रेस्टॉरंटच्या मालकांमध्ये याबाबत अजूनही संभ्रम आहे. त्यामुळे नाईट लाईफचा हा प्रयोग अपयशी ठरतो का? असा प्रश्न सामान्यांनकडून विचारला जात आहे.