मुंबई मेट्रोने 'मेट्रो वूमन' अश्विनी भिडेंचा केला सन्मान

    दिनांक  25-Jan-2020 15:57:39


saf_1  H x W: 0

 


मुंबई : राज्य सरकारने सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांची मेट्रो-३ च्या संचालक पदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी रणजितसिंह देओल यांची नेमणूक करण्यात आली. भिडे यांचा मेट्रो-३ च्या संचालक पदाचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये पूर्ण झाला होता. मात्र त्यांना सरकारकडून कार्यकाळ वाढवून देण्यात आलेला नाही. परंतु, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने अश्विनी भिडे यांच्या कार्याला सलाम केला आहे. एमएमआरसीने एक मानपत्र जारी करून त्यांच्या कामाचा गौरव केला आहे.

 
safs_1  H x W:  
 

"२०१५ पासून आपण मेट्रो-३ या प्रकल्पासाठी काम करत आहात. मेट्रो- ३ प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यासाठी आपल्या चित्तात अखंड तेवणारी ध्येयवादाची ज्योत आणि अतिशय कमी प्रमाणात मनुष्यबळ असलेली प्रारंभीची सामग्री हाताशीघेऊन आपण फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली. अतिशय तुटपुंजे मनुष्यबळ हाताशी घेऊन हे विकासकाम करणे कसोटी पाहणारे होते. पण आपण खंबीर राहिलात. प्रकल्प पुढे कसा जाईल यासाठी योजना आखून त्या कार्यान्वित करण्यात आपण आनंद मानला. हे अतिशय स्पृहणीय आहे. मेट्रो-३ प्रकल्पाचे काम करत असताना आपल्यापाशी अहंकाराचा लवलेश फिरकला नाही. मी हे केलं म्हणण्यापेक्षा माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीनं ही कामे झाली आणि होत आहेत, असं म्हणत संघभावना जोपासली." असे म्हणत त्यांनी अश्विनी भिडे यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

 

पुढे "कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो पण अनेक संकटांशी सामना करून मिळवलेला विजय हा इतिहास घडवतो. आपले अष्टपैलू व्यक्तीमत्त्व, मनमिळावू वृत्ती, काम करण्याची जिद्द, कामाप्रतीचा प्रमाणिकपणा आणि प्रचंड मेहनतीची तयारी या गुणांचा आदर्श घेऊन संस्थेतील अधिकारी आणि कर्मचारी त्या प्रेरणेने घडू लागले. आपण शून्यातून मेट्रो-३ प्रकल्पाचे विश्व निर्माण केले. अशा प्रभावशाली कार्यशैली, उत्कृष्ट प्रशासक, कणखर नेतृत्व आणि अजोड गुणवत्ता असलेल्या 'मेट्रो वूमन'ला मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कुटुंबातील सदस्यांकडून मानाचा मुजरा." असे म्हणत त्यांना मेट्रो वूमन ही पदवी देण्यात आली.