शेतकरी देशमुख यांनी घेतली विरोधी पक्षनेत्यांची भेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी आलेले शेतकरी महेंद्र देशमुख यांना पोलीसांकडून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता.
शेतकऱ्यांना न्याय केवळ भाजपच देऊ शकतो, अशी प्रतिक्रीया राम कदम यांनी या भेटीनंतर दिली आहे. देशमुख यांनी मंगळवार, दि. २१ जानेवारी रोजी फडणवीस यांची भेट घेतली होती.
मात्र, याच शेतकऱ्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात सन्मानपूर्वक वागणूक मिळाल्याची माहिती आमदार राम कदम यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशमुख यांच्या प्रकरणात लक्ष घालून तोडगा काढू, अशी मागणी केली होती. कृषी मंत्री दादा भूसे, तहसीलदार, बॅंक अधिकारी यांच्याकडे चकरा मारल्यानंतरही तोडगा न निघाल्याने देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन आपले म्हणणे सांगितले.
आपल्याला न्याय मिळेल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याची माहिती या भेटीनंतर देशमुख यांनी दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊनही शेतकऱ्याची फरफट होत असल्याबद्दल भाजपने सरकारवर टीका केली आहे.