सीएएचे समर्थन ; हिंदू वस्तीचा पाणीपुरवठाच केला बंद

24 Jan 2020 16:05:52


KERLA_1  H x W:


केरळ : भारतीय जनता पक्षाच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आयोजित सभेत वस्तीतील तीन लोक सहभागी झाल्याच्या कारणावरून संपूर्ण वस्तीला पाणीपुरवठा करणाऱ्या मुस्लीम कुटुंबीयाने पाणीपुरवठा बंद केल्याचा धक्कादायक प्रकार केरळमध्ये समोर आला. सेवा भारती नावाच्या स्वयंसेवी संस्थेने या वस्तीतील हिंदू घरांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी पाऊल उचलले.



केरळमधील
वलन्चेरी गावात एका वस्तीत गेल्या वर्षभरापासून पाणीपुरवठा योजना बंद होती. यादरम्यान गावातील एक मुस्लीम कुटुंब या वस्तीला रोज ३ बदल्या पाणीपुरवठा करत असे. परंतु काही दिवसांपूर्वी याभागात भारतीय जनता पक्षातर्फे नागरिकत्व सुधारणा कायदा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वस्तीतील तीन लोक सीएएला पाठिंबा देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजर राहिले. त्यानंतर त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे पाहिल्यानंतर इतर मुस्लीम समाजाच्या लोकांनी पाणी पुरवठा करणाऱ्या त्या मुस्लीम कुटुंबावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. म्हणून या कुटुंबाने पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला, असे वस्तीतील लोक सांगतात .





याबाबत भाजप खासदार शोभा करंदलाजे यांनी ट्वीट करत हा प्रकार समोर आणला होता. यानंतर महसूल विभागाने हा पाणी पुरवठा सुरू व्हावा यासाठी तातडीने सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेतला. या ट्वीटमुळे खासदार करंदलाजे यांच्यावर सोशल मिडीयावरून धार्मिक भावना भडकाविल्याच्या आरोपातून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 



याचा सीएएशी संबंध नसून माझ्या पत्नीने काही तांत्रिक कारणामुळे हे पाणी बंद केल्याची माहिती त्या मुस्लीम कुटुंबातील सदस्य सैनूद्दीन कलप्पडथील यांनी सांगितले. दरम्यान, या वस्तीला तातडीने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेईल असे तिरूरचे तहसीलदार टी. मुरली यांनी सांगितले. या वस्तीतील नागरिकांनी केलेल्या आरोपांची चौकशी आम्ही करत असल्याचेही मुरली म्हणाले.

Powered By Sangraha 9.0