
नवी दिल्ली : दिल्लीच्या जामिया मिलिया युनिव्हर्सिटी आणि न्यू फ्रेंड्स कॉलनीमध्ये १५ डिसेंबर २०१९ रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी कॉंग्रेसचे माजी आमदार आसिफ मोहम्मद खान, स्थानिक नेते आशु खान यांना नोटीस पाठविली आहे. सीआरपीसीच्या कलम १६०च्या अंतर्गत गुन्हे शाखेने ही नोटीस पाठविली आहे. या सर्वांना शुक्रवारी,२४ जानेवारी रोजी गुन्हे शाखेच्या चाणक्यपुरी कार्यालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहे, त्याठिकाणी त्यांची चौकशी होईल.
जामिया हिंसाचार प्रकरणात स्थानिक नागरिक असलेल्या फुरकान यालाही गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आतापर्यंत १३ लोकांना अटक करण्यात आली आहे. जामिया हिंसाचाराबद्दल गुन्हे शाखेकडून मिळालेल्या नोटीसवर कॉंग्रेसचे माजी आमदार आसिफ मोहम्मद खान यांचे म्हणणे आहे की, ‘पोलिसांकडे माझ्याविरूद्ध पुरावे नाहीत. जेव्हा बस पेटविण्यात आल्या तेव्हा मी शाहीन बागच्या कामगिरीवर होतो जे आजही चालू आहे. पोलिस देखील माझे भाषण रेकोर्ड करत होते, हा सर्वात मोठा पुरावा आहे.’