कंगना झाली विराटची फॅन!

    दिनांक  24-Jan-2020 15:10:05

kangana_1  H x


‘पंगा किंग’ म्हणत केले विराटचे कौतुक


मुंबई : कंगना राणावत सध्या तिच्या पंगा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. शुक्रवारी तिचा पंगा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित झाला. त्या निमित्ताने नुकतीच कंगना क्रिकेट सामन्याचे प्रसारण करणाऱ्या वाहिनीवर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली होती. यावेळी तिने भारताचा कर्णधार विराट कोहलीचे भरभरून कौतुक केले. तिने विराटला 'पंगा किंग' म्हणत मी त्याची फॅन असल्याचेही म्हटले. कंगना विराटबद्दल म्हणाली की, 'तो फार धाडसी आहे आणि प्रत्येक आव्हानांसाठी तो तयार असतो. पंगा आणि भारत- न्यूझीलंडचा सामनाही एकाच दिवशी आहे.'

चित्रपटाबद्दल सांगता कंगना म्हणाली की, मी आणि विराट एकाच दिवशी पंगा घेतोय. मी चित्रपटगृहात तर तो मैदानात. पंगा चित्रपटात कंगना एका गृहिणीची आणि कब्बडीपटूची भूमिका साकारत आहे. आज देशभरात जवळपास १२०० ते १५०० स्क्रीनवर प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचा विषय सर्वसामान्यांना आकर्षित करणारा आहे. लग्नानंतरही महिला त्यांचे करिअर नव्याने सुरू करू शकतात असा या चित्रपटाच्या कथेचा आशय आहे.