नीरव मोदीच्या संपत्तीचा होणार लिलाव

22 Jan 2020 10:49:35

nirav modi_1  H


लिलावात एकूण १५ महागड्या चित्रांचा समावेश 


मुंबई : पंजाब नॅशनल बँकेला तब्बल १३ हजार कोटींचा चुना लावून फरार होणाऱ्या हिरेव्यापारी नीरव मोदीच्या जप्त करण्यात आलेल्या महागड्या कार, लाखो रुपये किंमतीची घड्याळे आणि अन्य महागड्या वस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे. या वस्तूंचा तीन टप्प्यांत लिलाव करण्यात येणार आहे.


पहिला लिलाव हा २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर, दुसरा लिलाव ३ मार्च आणि चौथा लिलाव ४ मार्च रोजी होणार आहे. हा लिलाव ऑनलाईन होणार आहे. या लिलावाची जबाबदारी जबाबदारी सॅफरन आर्ट्सकडे सोपवण्यात आली आहे.


लिलाव करण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये १५ आर्टवर्कचा समावेश आहे. या आर्टवर्कमध्ये अमृता शेरगिल यांची १९३५ मधील कलाकृती आहे. ज्याची किंमत जवळपास १२-१८ कोटी रुपये असल्याचे सांगितलेजात आहे. शिवाय चित्रकार एम.एफ. हुसैन यांचे महाभारताशी संबंधित एक तैलचित्र, व्ही.एस. गायतोंडे यांचे १९७२ मधील एक चित्र ज्याची किंमत जवळपास ७-९ कोटी रुपयांच्या घरात आहे अशा गोष्टींचा समवेश आहे.


महागड्या घड्याळांशिवाय मोदीच्या या संपत्तीमध्ये ८० ब्रँडेड हँडबॅगही आहे. लिलावासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात या वस्तूंविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली. लिलावातील काही वस्तू दिल्लीतील ओबेऱॉय हॉटेलमध्ये आयोजित इंडिया आर्ट फेअरमध्ये ठेवण्यात येणार आहेत.

Powered By Sangraha 9.0