मोहन सालेकर यांचा 'आर्य चाणक्य' पुरस्काराने गौरव

    दिनांक  22-Jan-2020 20:11:11


saf_1  H x W: 0

 


मुंबई : आंतरराष्ट्रीय पाक्षिक 'चाणक्य वार्ता'च्यावतीने नैतिक शिक्षण आणि संस्कृतीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे 'संस्कृति संवर्धन प्रतिष्ठान'चे विश्वस्त मोहन सालेकर यांना 'आर्य चाणक्य पुरस्कार-२०२०'ने गौरविण्यात आले. माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्याला उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, 'चाणक्य वार्ता'चे संपादक डॉ. अमित जैन, रा. स्व. संघ कोकण प्रांताचे संपर्क प्रमुख डॉ. रवींद्र संघवी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी मोहन सालेकर म्हणाले, "हा सन्मान 'संस्कृति संवर्धन'चे कार्य करणार्‍या सर्व कार्यकर्त्यांचा आहे. गेली १६ वर्षे सातत्याने भारतीय संस्कृती, संस्कार आणि जीवनमूल्यांचे बीजारोपण करण्याचा प्रयत्न 'संस्कृति संवर्धन प्रतिष्ठान' करीत आहे. 'आर्य चाणक्य' यांच्या नावाने मिळालेल्या या सन्मानामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची उमेद अधिक वाढली आहे. या सन्मानासाठी माझी निवड केल्याबद्दल मी 'चाणक्य वार्ता' पाक्षिकाच्या सन्माननीय पदाधिकार्‍यांचे आभार मानतो." राजभवनातील सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात श्रीमंत शिवराज राजे शितोळे (राष्ट्र सेवा), मुकेश भट्ट ( फिल्म निर्माता), अनुराधा पौडवाल (पार्श्वगायन), अरुणा ईरानी (अभिनय), डॉ. जे. जे. रावल (खगोलशास्त्र), गिरीशभाई शहा (पर्यावरण आणि पशुसंवर्धन) आदी मान्यवरांनाही गौरविण्यात आले.