'गगनयान मिशन केवळ मानवास अंतराळात पाठविणे इतकेच नाही'

22 Jan 2020 12:56:25


k sivaan_1  H x



बंगळुरू
: बंगळुरू येथे भारताच्या महत्वाकांक्षी मिशन गगनयान मिशनवर बोलताना इस्त्रोचे प्रमुख के सिवान म्हणाले,"गगनयान मिशन केवळ मानवांना अंतराळात पाठवणे इतकेच मर्यादित नसून हे अभियान आपल्याला दीर्घकालीन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचा रोडमॅप तयार करण्याची संधी देते.'


इस्त्रोचे प्रमुख म्हणाले की
, 'आपल्या सर्वांना हे माहित आहे की वैज्ञानिक शोध,आर्थिक विकास, शिक्षण, तंत्रज्ञान विकास आणि प्रेरणादायी युवक हे सर्व राष्ट्राचे लक्ष्य बनत आहेत. या सर्व उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी मानवी अंतराळ उड्डाण योग्य मंच उपलब्ध करून देते.' तत्पूर्वी, भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) १ जानेवारी रोजी जाहीर केले होते गगनयान कार्यक्रमासाठी चार अंतराळवीरांची निवड झाली आहे आणि लवकरच त्यांचे रशियामध्ये प्रशिक्षण सुरू होईल. या अंतराळवीरांसाठी फूड मेन्यूही तयार करण्यात आला आहे.

Powered By Sangraha 9.0