वनमंत्र्यांची ऐरोलीतील सागरी जैवविविधता केंद्राला भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2020
Total Views |

tiger_1  H x W:


ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याची केली सफर

 

मुंबई (प्रतिनिधी) - ऐरोली येथीलकिनारी व सागरी जैवविविधता केंद्राला महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याची पाहणी केली. अभयारण्यात मोठ्या संख्येने स्थलांतरित झालेल्या फ्लेमिंगोसारख्या हिवाळी पाहुण्यांना पाहून त्यांनी अभयारण्य प्रशासनाचे कौतुक केले. यावेळी त्यांनी या अभयारण्याच्या संवर्धनासाठी अधिक प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केले.

 
 

नवी मुंबईतील ऐऱोली नजीकच्या खाडी क्षेत्राजवळ वन विभागाच्यामँग्रोव्ह सेल’कडून उभारण्यात आलेले ’किनारी व सागरी जैवविविधता केंद्र’ आहे. कांदळवनांमध्ये आढळणार्‍या जैवविविधतेची माहिती या केंद्रामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणाहून पर्यटकांना ठाणे खाडीत फ्लेमिंगो दर्शनाकरिता बोट सफरीच्या माध्यमातून जाता येते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर वन विभागाचे मंत्रिपद मिळालेले संजय राठोड यांनी या केंद्राला भेट देऊन तेथील विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी केंद्र परिसरात असलेल्या शोभिवंत माशांच्या प्रजनन केंद्राला भेट दिली. येत्या काळात केंद्र आवारात उभारल्या जाणार्‍या सागरी संग्रहालयात ठेवण्यात येणार्‍या देवमाशाच्या सांगाड्याची त्यांनी पाहणी केली. मुंबईत लवकरच स्थापन होणार्‍या गोराई व दहिसर कांदळवन उद्यानाचे काम जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या. या कार्यक्रमावेळी ’मँग्रोव्ह सेल’चे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी, विभागीय वन अधिकारी डी.आर. पाटील, साहाय्यक वन संरक्षक गीता पवार आणि वनपरिक्षेत्र अधिकारी एन.जी.कोकरे व डी. एस. कुकडे उपस्थित होते.

 
 
@@AUTHORINFO_V1@@