सोमणांच्या समर्थनार्थ कार्यक्रमाला ठाकरे पोलिसांनी दाखविला कोठडीचा धाक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0

 


शिवसेना कार्यकर्त्यांकडून विरोध होण्याची दाट शक्यता


मुंबई : आपल्या संविधानिक अधिकारांचा वापर करून सनदशीर मार्गाने एकत्रित येऊ इच्छिणाऱ्यांना पोलीस प्रशासनाने कोठडीचा धाक दाखविला आहे. सावरकर विचारांचे समर्थन केले म्हणून मुंबई विद्यापीठाने सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या योगेश सोमणांच्या समर्थनार्थ विवेक विचार मंचाने कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु शिवाजी पार्क पोलीस ठाण्याने या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. विवेक विचार मंचाच्या वतीने हा कार्यक्रम बुधवार , दि. २२ जाने. रोजी आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार मंचाचे कार्यकर्ते शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात परवानगीचे पत्र घेऊन गेले होते. मात्र कार्यक्रमास परवानगी देता येणार नाही , तसेच कार्यक्रम केल्यास गुन्हे दाखल करू, असे उत्तर उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहे.

 

योगेश सोमण मुंबई विद्यापीठाच्या थेटर आर्टस् या विभागाच्या संचालक पदावर आहेत. राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केल्यावर त्यांची खरडपट्टी काढणारा व्हिडीओ योगेश सोमण यांनी समाजमाध्यमांवर टाकला होता. काही डाव्या विद्यार्थी संघटनांनी विरोध केल्यानंतर योगेश सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठविले होते. विद्यापीठातील नियमित विद्यार्थी योगेश सोमण यांचे समर्थन करू इच्छितात. सावरकर विचारांच्या व्यक्तीला समर्थन देण्यासाठी दादर शिवाजी पार्क येथेही काही नागरिक एकत्रित येणार होते. संबंध कार्यक्रम विवेक विचार मंचाच्या वतीने आयोजित केला जाणार होता. मात्र परवानगी साठीचा अर्ज घेऊन गेलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी कार्यक्रम घेण्यास अनुमती दिलेली नाही. तसेच कार्यक्रम केला तर गुन्हे दाखल करू, असेही बजावण्यात आले. फौजदारी दंड संहितेच्या कलम १४९ अन्वये नोटीस देखील देण्यात आली आहे.

 

शिवसेना कार्यकर्त्यांकडून विरोध होण्याची दाट शक्यता

 

नोटिशीतील तिसऱ्या परिच्छेदात, “त्यातच स्व. मीनाताई ठाकरे पुतळा हा शिवसेना कार्यकर्त्यांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमास त्यांच्याकडून विरोध होण्याची दाट शक्यता आहे,” असे पोलिसांनी म्हटले आहे.

 
 
@@AUTHORINFO_V1@@