तरुणाईच्या वेगळ्या वाटेवरील कथेची साक्ष…

    दिनांक  21-Jan-2020 15:37:17
|

mann fakira_1  

 


मृण्मयी देशपांडे लिखित मन फकिराचा पहिला टिझर प्रदर्शित...


मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृण्मयी प्रतिभा देशपांडे ‘मन फकिरा’ या चित्रपटाच्याच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकताच या चित्रपटाचा पहिला टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित केला. 'मन फकिरा' या चित्रपटात सुव्रत जोशी हा ‘भूषण’ तर सायली संजीव ही ‘रिया’ ही पात्रे साकारत आहेत.


भूषण-रिया यांचे मराठमोळ्या
‘कांदापोहे’ पद्धतीने लग्न होते आणि त्यानंतर सगळे काही सुरळीत सुरु असताना एका रात्री दोघांचेही भूतकाळ समोर येतात. लग्न...त्यांच्यातील प्रेम...त्यांचा संसार... त्यात येणारे ते दोघे... आणि पुन्हा मग विस्कटलेपण... हे दोघे या सर्व गोष्टीला कसे समजुतदारणे सामोरे जातात आणि पुढे नक्की काय निर्णय घेतात... हीच कथा या चित्रपटात दाखवली जाणार आहे.
‘प्रेम...आहे, नाही, बहुतेक, वगैरे...’ अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर घातली आहे. ‘मन फकिरा’मध्ये सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


पर्पेल बुल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमटेड आणि स्मिता फिल्म प्रॉडक्शन्सच्या यांची प्रस्तुती असलेला ‘मन फकीरा’ या चित्रपटाची निर्मिती एस. एन. प्रॉडक्शन्स आणि स्मिता विनय गानु, नितीन प्रकाश वैद्य, ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार आणि किशोर पटेल यांनी केली असून चित्रपटाची सहनिर्मिती तृप्ती कुलकर्णी आणि प्रणव चतुर्वेदी याची आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.