भारत न्यूझीलंडला रवाना पण, हा खेळाडू बाहेर...

21 Jan 2020 17:06:18


asf_1  H x W: 0


नवी दिल्ली : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला हरवून एकदिवसीय मालिका खिशात घातली. आता हा संघ न्यूझीलंडला त्यांच्याच मैदानात भिडण्यास सज्ज झाला आहे. पण यापूर्वीच भारताला एक मोठा झटका बसला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी करणारा शिखर धवन मात्र न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर झाला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. इतर संघ मात्र न्यूझीलंडला रवाना झाला आहे.

 

ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेमध्ये धवनने २ डावांमध्ये अर्धशतक केले होते. तिसऱ्या सामन्यामध्ये त्याच्या खांद्याला दुखापत झाली आणि तो सलामीची मैदानावर आलाच नाही. त्या दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्यामुळे त्याला न्यूझीलंड दौऱ्याला मुकावे लागणार आहे. येत्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, अद्याप बीसीसीआयकडून याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.

 

भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर २४ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान ५ टी २० सामने खेळणार आहे. त्यानंतर ५ ते ११ फ्रेब्रुवारी दरम्यान ३ एकदिवसीय मालिका होणार आहे. तर दौऱ्याच्या अखेरीस २१ फेब्रुवारी ते ४ मार्च या दरम्यान २ कसोटी सामने खेळणार आहेत.

Powered By Sangraha 9.0