तिरुपतीला जाणारे विमान अचानक रद्द झाल्याने प्रवासी संतापले

21 Jan 2020 12:58:32


tirupati _1  H



कोल्हापूर : थंडी वाढल्याने दृश्यमानता कमी झाल्याच्या कारणावरून इंडिगोचे कोल्हापूर विमानतळावरून तिरुपतीच्या दिशेने जाणारे विमान अचानक रद्द करण्यात आले. विमान अचानक रद्द करण्यात आल्याने संतप्त प्रवाशांकडून विमानतळावर गोंधळ करण्यात आला, तसेच प्रवाशांकडून इंडिगोच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर विमानतळ प्राधिकरणच्या अधिका-यांनी दिलगिरी व्यक्त करीत पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन प्रवाशांना दिले. मागील काही दिवसांपासून ऐनवेळी विमान रद्द करण्याचे प्रकार वाढल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

Powered By Sangraha 9.0