'खेलो इंडिया'त महाराष्ट्राचा विक्रम ; पदाचे द्विशतक पूर्ण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0


गुवाहाटी : भारत सरकारने आयोजित केलेल्या 'खेलो इंडिया २०२०' स्पर्धेमध्ये भारताने सर्वोत्तम कामगिरी करत अव्वल स्थान टिकवून ठेवले आहे. महाराष्ट्राने २२८ पदकांची कामे करत द्विशतकी एकदा गाठला आहे. यामध्ये ७२ सुवर्ण, ६६ रौप्य आणि ९० कांस्य पदकांची समावेश आहे. महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी सोमवारी एका दिवसात ३ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्य अशी एकूण सहा पदके जिंकले. तसेच महाराष्ट्राच्या खो खो संघाने ४ सुवर्ण पदके जिंकली.

 

महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील आणि २१ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या संघाने मिळून ४ सुवर्ण पदक पटकावली. केनिशा गुप्ताने मुलींच्या १७ वर्षाखालील गटात २०० मीटर्स वैयक्तिक मिडले रिले शर्यत २ मिनिटे २५.८० सेकंदांत जिंकली. तिचीच सहकारी अपेक्षा फर्नान्डीस हिने रौप्यपदक पटकाविले. केनिशा आणि अपेक्षा यांनी करिना शांता आणि पलक धामी यांच्या साथीत १७ वर्षांखालील ४ बाय १०० मीटर मिडले रिले शर्यतीचेही सुवर्णपदक पटकावले. मुलांच्या १७ वर्षांखालील गटात वेदांत बापनाने २०० मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत सोनेरी कामगिरी केली. त्याच वयोगटात सुश्रूत कापसेने ८०० मीटर फ्रीस्टाइल शर्यतीत रौप्यपदक मिळवले.

 

महाराष्ट्राच्या रितेश म्हैसाळने युवा गटाच्या ८९ किलो विभागात रौप्यपदक पटकावले. तर त्याचाच सहकारी सानिध्य मोरे याला याच विभागात कांस्यपदक मिळाले. मुलींच्या युवा ७६ किलो गटात महाराष्ट्राच्या श्रेया गणमुखी हिने रौप्यपदकाची कमाई केली. तर कनिष्ठ मुलींच्या ७६ किलो गटात महाराष्ट्राच्या करुणा गढे हिला कांस्यपदक मिळाले.

@@AUTHORINFO_V1@@