‘झुंड नही सर टीम कहिये टीम...’

    दिनांक  21-Jan-2020 13:09:03
|

zund_1  H x W:बिग बींच्या दमदार आवाजात ’झुंड’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

मुंबई : बॉलिवूडचे बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या आगमी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. यावर्षी त्यांचे एक-दोन नव्हे तर तब्बल ५ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे यंदाचं वर्ष बिग बी गाजवणार हे नक्की! सोमवारी पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर मंगळवारी त्यांच्या बहुचर्चित 'झुंड' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. सध्या सोशल मीडियावर या टीझरची जोरदार चर्चा सुरू आहे.

अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला झुंड हा चित्रपट प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये काही मुलांचा घोळका हातात बॅट, चैन आणि हॉकी स्टीक इत्यादी घेऊन चालताना दिसत आहे. तर बॅकग्राउंड म्युझिकसोबत झुंड नही सर टीम कहिये टीम’ असा अमिताभ यांच्या दमदार आवाजातला डायलॉग ऐकू येतो.


झुंड’चे बहुतांश चित्रीकरण हे महाष्ट्रातील नागपूर शहरात झाले आहे. साधेपणा हे नागराज मंजुळेंच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य, त्यांनी याही चित्रपटात ते जपले आहे. नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांच एकत्र काम करत आहेत. आणि या चित्रपटाच्या माध्यमातून नागराज हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.