नाशिकचा कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीरचा सन्मान

21 Jan 2020 16:48:09
Harshavardhan Sadgir_1&nb
 
 
 

पालिकेचा सदीच्छा दूत म्हणून नियुक्ती


नाशिक : महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवणारा कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर याचा नाशिक महापालिकेच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे. त्याला बक्षीस म्हणून ११ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. हर्षवर्धन सदगीर याची नाशिक महापालिकेचा सदीच्छा दुत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

या संबंधित ठराव सोमवार, दि. २१ रोजी झालेल्या महासभेत संमत करण्यात आला. पालिकेच्या येत्या २८ तारखेला महाकवी कालिदास कलामंदिरात नाशिककरांकडून नागरी सत्कार करण्यात येणार आहे . हर्षवर्धन सदगीर हे मुळच्या अकोले तालुक्यातील रहिवासी असले तरी, स्वा. सावरकर यांच्या जन्मभूमी असलेल्या भगूर गावात त्यांनी कुस्तीचे धडे गिरवले.

 

नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्र केसरी हा किताब पटकाविला. सदगीर यांना पालिकेचे सदिच्छा दूत म्हणून निवड करावी आणि त्यांचा अभिनंदनाचा ठरावास स्थायी समितीकडून यापुर्वीच मान्यता देण्यात आली होती. महापौर सतिश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी एक समितीही गठित करण्यात आली आहे.

 

दरम्यान, महासभेत अभिनंदनाचा ठराव पारित होत असताना सभागृहातील नगरसेवकांनी सदगीर यांची शहरातून भव्य मिरवणूक काढण्याच्या सूचनेबरोबरच ३ लाख रूपये रोख रक्कम , चांदीची गदा भेट देऊन आलिम्पिकसाठी सदगीर यांना आर्थिक मदतीचा हात द्यावा , यासारख्या सुचनाही मांडल्या. तसेच नागरिकांनाही मदतीचे आवाहन करावे आणि नागरी सत्कार सोहळ्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांना निमंत्रित करण्याची सुचनाही यावेळी पुढे आली.



 
Powered By Sangraha 9.0