सुरतमधील प्रसिद्ध कपडा मार्केटला आग

21 Jan 2020 10:24:53
fire_1  H x W:




अग्निशमनदलाच्या ४० गाड्या घटनास्थळी रवाना


सुरत
: सुरतमधील प्रसिद्ध रघुवीर सेलियम मार्केट इमारतीच्या सातव्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या तब्बल ४० गाड्या घटनास्थळी पोहोटचल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. ही मोठी असली तरी सुदैवाने कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही.


ही आग आज पहाटे ४ वाजता लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४० गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. रघुवीर सेलियम मार्केटची ही १० मजली इमारत आहे. या आगीमुळे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.


सदर
इमारत सारोली क्षेत्रात आहे. सातव्या मजल्यावर लागलेली ही आग इतरही मजल्यांवर पसरली असल्याचे वृत्त आहे. या १० मजली इमारतीत कपड्याचे मार्केट आहे. १५ दिवसांपूर्वी देखील या परिसरात आगीची घटना घडली असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

Powered By Sangraha 9.0