सैन्य दलासोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2020
Total Views |


pulvama _1  H x



पुलवामा : येथील पंपोर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. त्याचवेळी सुरक्षा दलाचे दोन सैनिक देखील जखमी झाले आहेत. या भागात अद्याप दोन दहशतवादी लपले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यामधली ही चौथी चकमक आहे. काल झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी शोपियानच्या वाची भागात हिज्बुलच्या तीन अतिरेक्यांना ठार मारले होते.



मंगळवारी सकाळी सुरक्षा दलांना पंपोर भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. लवकरच सुरक्षा दलाने या भागाला घेराव घालण्यास सुरवात केली. याची माहिती मिळताच दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात सैन्याने जैश दहशतवाद्याला ठार मारले आहे. त्याचवेळी दोन सैनिक जखमी झाले आहेत. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,"आम्ही मृत दहशतवाद्याचा मृतदेह परत मिळाल्याशिवाय दहशतवादी मारला गेल्याबाबत खात्री देऊ शकत नाही. चकमकीत सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे. परंतु सुरक्षा दलाच्या या आवाहनाकडे दुर्लक्ष करून दहशतवादी सातत्याने गोळीबार करीत आहेत.त्याला सैन्य चोख प्रत्युत्तर देत आहे.”



आदिल शेख हा काल शोपियामध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एक आहे. तो शोपियानाचा रहिवासी होता. त्यांनी जम्मू-काश्मीर पोलिसात एसपीओ म्हणूनही काम केले होते. जिथून तो हिजबुल या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी पळाला. २९ सप्टेंबर २०१८ रोजी जवाहर नगर श्रीनगर येथील पीडीपीचे तत्कालीन आमदार अजाज मीर यांच्या घराकडून त्याने ८ शस्त्रास्त्र चोरले. दुसरा दहशतवादी वसीम वानी होता. हासुद्धा शोपियाचा रहिवासी होता. जहांगीर मलिक असे तिसर्‍या दहशतवाद्याचे नाव आहे. तो पुलवामा जिल्ह्यातील आचेनचा रहिवासी होता.

@@AUTHORINFO_V1@@