'ईव्हीएमवर विश्वास नाही, मग निवडणूक रिंगणात का ?'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2020
Total Views |


sazia elmi_1  H



नवी दिल्ली : ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणारे आणि पुन्हा एकदा दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या सौरभ भारद्वाज यांच्यावर भाजप नेत्या शाझिया इल्मी यांनी निशाणा साधला. आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आणि ग्रेटर कैलाश विधानसभेचे उमेदवार सौरभ भारद्वाज यांचा ईव्हीएमवर विश्वास नसताना, निवडणूक लढविण्याचे कारण काय असा प्रश्न उपस्थित करत सौरभ भारद्वाज यांना लक्ष्य केले. सौरभ भारद्वाज यांनी २०१७मध्ये विधानसभेत ईव्हीएम सारखी मशीन हॅक करण्याचा थेट डेमो केला होता.




शाझिया इल्मी यांनी सौरभ भारद्वाज यांच्यावर टीका करत ट्विट केले की,"जर सौरभ भारद्वाज यांचा ईव्हीएमवर विश्वास नाही तर मग ते निवडणूक का लढवत आहेत ? या खोटारड्या व्यक्तीऐवजी भाजपाचे उमेदवार शिखा राय यांना मतदान करा."



भारद्वाज यांनी विधानसभेत ईव्हीएम हॅकिंग डेमो दाखविला होता


सौरभ भारद्वाज यांनी दिल्लीतील एमसीडी निवडणुकीत ईव्हीएम हॅकिंगचे दावे केले होते. इतकेच नाही तर त्यांनी २०१७ला विधानसभेत याचे थेट प्रात्यक्षिक देखील दाखवत भाजपवर ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला. तथापि
, भारद्वाज यांच्या दाव्याला निवडणूक आयोगानेच साफ नकार दिला आणि म्हटले की कोणत्याही प्रकारे ईव्हीएम मशीन हॅक करता येत नाही.

@@AUTHORINFO_V1@@