लवकरच उलगडणार ‘चोरीचा मामला’

    दिनांक  21-Jan-2020 11:55:52
|

cm_1  H x W: 0‘चोरीचा मामला’मध्ये दिसणार कलाकारांची धम्माल-मस्ती

मुंबई : दमदार स्टारकास्ट आणि पुरेपूर मनोरंजन करणारं कथानक असलेल्या ‘चोरीचा मामला’ या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला. एका चोरीमुळे होणारी गुंतागुंत या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. चित्रपटाची संकल्पनाच मजेशीर आहे, त्यात प्रासंगिक विनोद, खुमासदार संवादांचा तडका या कथानकाला मिळाला आहे. त्याशिवाय ताल धरायला लावणारं संगीत हेही चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे.
जितेंद्र जोशी, मंगेश कांगणे, जय अत्रे यांनी चित्रपटाची गाणी लिहिली असून चित्रपटाचे संगीत चिनार महेश यांचे आहे तर चित्रपटाचे शीर्षक गीत प्रफुल्ल-स्वप्नील यांचे आहे. शाल्मली खोलगडे, प्रियांका बर्वे, चिनार खारकर, स्वप्नील गोडबोले, कविता यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. या चित्रपटामुळे प्रेक्षकांना पूरेपूर मनोरंजन मिळणार हे ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे.


एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत आणि स्वरुप स्टुडिओजच्या सहकार्याने सुधाकर ओमाळे
, आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार, स्मिता ओमाळे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रियदर्शन जाधवनं या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, कीर्ती पेंढारकर, अनिकेत विश्वासराव आणि क्षिती जोग अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला भरभरून प्रतिसाद मिळत असून, ३१ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.