दीपिकाचे प्रमोशन फंडे काही संपेनाच!

    दिनांक  21-Jan-2020 11:18:06
|

deepika_1  H xटिकटॉक चॅलेंजमधून अॅसिड पिडीतांच्या भावना दुखावल्याने दीपिका पुन्हा वादात

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण मागच्या काही काळापासून चर्चेत आहे. तिचा छपाक चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा हवा तितका प्रतिसाद मिळाला नाही. चित्रपट प्रदर्शनापूर्वी जेएनयूतील विद्यार्थ्यांची भेट घेतल्याने दीपिका वादात सापडली होती. त्यावेळी बॉयकॉट छपाक असा हॅशटॅग वापरत सोशल मीडियावर दीपिकाला विरोध केला गेला होता. त्यानंतर आता टिकटॉक इन्फ्लूएन्सरला छपाक लुकचे चॅलेंज दिल्याने दीपिका पुन्हा एकदा वादात सापडली आहे.


सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये दीपिका एका टिकटॉक इन्फ्लूएन्सरला छपाक चित्रपटाच्या लुकचे चॅलेंज देताना दिसत आहे. या व्हिडीओमुळे दीपिका पुन्हा एकदा वादात सापडली आहे. दीपिकाच्या या चॅलेंजला संवेदनाहीन, मूर्खपणा आणि पब्लिसिटीचा सर्वात वाईट प्रकार असल्याचे म्हटले जात आहे.

 सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या ३९ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये दीपिका मेकअप आर्टिस्ट फॅबी हिला स्वतःच्या तीन चित्रपटांचे लुक रिक्रिएट करण्याचे चॅलेंज देताना दिसते आहे. या व्हिडीओत फॅबी सर्वात आधी दीपिकाचा पहिला चित्रपट ओम शांति ओम, त्यानंतर पिकूचे लुक रिक्रिएट करते आणि सर्वात शेवटी ती छपाकचा अ‍ॅसिड अ‍ॅटॅक लुक रिक्रएट करते. तिच्या या लुक वरुनच दीपिकावर खूप टीका केली जात आहे.


अनेकांनी दीपिकावर अ‍ॅसिड अ‍ॅटॅकच्या दुःखाची चित्रपटाच्या लुकशी तुलना केल्याचा आरोप केला आहे. तर अनेकांनी तिच्या या प्रश्न उपस्थित केले आहेत. नेटीझन्सनी दीपिकाला चांगलेच बोल सुनावले आहेत. जेएनयूमध्ये जाऊन दीपिकाने लक्ष्मीच्या दुःखाची कमी खिल्ली उडवली होती का जे आता या पीडितांवर अशाप्रकारे टिकटॉक व्हिडीओ तयार करण्याचं चॅलेंज करत आहे, असे म्हणत एका युजरने दीपिकाव्हिषयी संताप व्यक्त केला. तर हा अ‍ॅसिड अ‍ॅटॅक पीडितांचा अपमान असून, स्वतःचा प्रचार करण्यासाठी दीपिका पदुकोण आणखी किती खालच्या पातळीला जाणार आहे. असा प्रश्नही एका युजरने उपस्थित केला.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.