योगेश सोमण समर्थकांच्या नोकरीवर गदा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2020
Total Views |


mumbai university_1 



मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातील संचालक योगेश सोमण यांच्यावरील चौकशी पूर्ण होईपर्यंत डॉ.गणेश चंदनशिवे यांच्याकडे नाट्यशास्त्र विभागाचे प्रभारी संचालकपद देण्यात आले आहे. परंतु प्रभारी संचालक पद स्वीकारताच चंदनशिवे यांनी विभागात नवीन नाट्याचा प्रारंभ केला आहे. योगेश सोमण यांनी नियुक्त केलेल्या व यांच्या समर्थनात उतरलेल्या व्हिजिटिंग फॅकल्टीच्या नोकरीवरच प्रभारी संचालकांकडून गदा आणण्यात आली आहे.


संबंधित शिक्षकांच्या सर्व तासिका काढून घेण्यात आल्या आहेत.
'अभ्यासक्रम अर्ध्यावर असताना अचानक तासिका का बंद घेतल्या याबाबत प्राध्यापकांना विचारणा केली असता,' विद्यापीठ प्रशासन किंवा प्रभारी संचालक काहीही सांगायला तयार नाहीत असे या शिक्षकांनी सांगितले. तसेच अचानक तासिका काढून घेतल्याने विद्यार्थ्यांनी देखील नाराजी व्यक्त केली.


संतोष जढाळ (स्टेज क्राफ्ट)
, अक्षय देशपांडे (संगीत) आणि हर्षवर्धन वाघमारे(फिजिकल थिएटर) या शिक्षकांच्या नियोजित तासिका काढून घेण्यात आल्या आहेत. याबाबत संतोष जढाळ यांनी कुलगुरूंना पत्राद्वारे आपल्या तासिका का बंद करण्यात आल्या याबाबत विचारणा केली आहे. तसेच निवेदनासोबत त्यांचा या क्षेत्रातील अनुभव व परिचय पत्रक देखील जोडले आहे. यावर प्रतिक्रीया देताना, जढाळ म्हणाले, "सोमण सरांना सक्तीच्या रजेवर पाठवेपर्यंत माझ्या तासिका सुरू होत्या. मुलांचीही माझ्याबाबत काहीही तक्रार नव्हती तरीही माझ्या तासिका बंद आल्या आहेत. याबाबत मी प्रभारी संचालकांना विचारले असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. मी कुलगुरूंकडे याबाबत लेखी विचारणा केली आहे."




jadhal_1  H x W


स्वरसाधना शिकविण्यासाठी येणाऱ्या अक्षय देशपांडे यांच्याही नियोजित तासिका काढून घेतल्याने त्यांनीही नाराजी व्यक्त करत हे सगळे काही विभागात ठरवून घडवून आणले जात असल्याची टीका केली. ते म्हणतात, "मी गेली १५ वर्षे या क्षेत्रात कार्यरत आहे. मी संगीत नाटकांमध्येही काम केले आहे. विभागात रुजू होण्यापूर्वी माझा अनुभव तसेच पात्रता पाहूनच माझी हा विषय शिकविण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. माझ्या तासिकांबाबत विद्यार्थ्यांनाही विचारू शकतात. अनेक विद्यार्थी या तासांना गैरहजर असत याबाबत ही मी तक्रार केली होती."

 



या प्रकरणी शिक्षकांनी कुलगुरूंना विचारणा केली असून कुलगुरू किंवा प्रभारी संचालक गणेश चंदनशिवे यांच्याकडून अजून कोणतेही उत्तर मिळाले नसल्याचे या शिक्षकांनी सांगतले. तसेच विद्यार्थ्यांनी प्रभारी संचालकांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत या सर्व घडामोडीत मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याची खंत ही व्यक्त केली.



 

@@AUTHORINFO_V1@@