कमलेश सावंत दिसणार स्वातंत्र्य सैनिकाच्या भूमिकेत!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2020
Total Views |

veer kotwal_1  


शहीद भाई कोतवालमध्ये कमलेश सावंत साकारणार गोमाजी पाटील


मुंबई :
अनेक हिंदी मराठी चित्रपटातून लक्षवेधी अभिनय करणारे कमलेश सावंत आता स्वातंत्र्य सेनानीच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. बहुचर्चित शहीद भाई कोतवाल या चित्रपटात कमलेश शहीद गोमाजी पाटील ही भूमिका सकारात आहेत. २४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.


शहीद भाई कोतवाल यांनी ब्रिटिशांच्या विरोधात सशस्त्र सेना स्थापन केली. वयाच्या ३१ व्या वर्षी
त्यांना वीरमरण आले. या लढ्यात त्यांची साथ देणाऱ्या गोमाजी पाटील आणि हिराजी पाटील या बाप लेकांच्या शौर्याची कथा ही या चित्रपटात पहायला मिळणार आहे. ‘भाई कोतवाल यांच्यावर आधारित या चित्रपटात शहीद गोमाजी पाटील यांची भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला आहे. एक स्फूर्तीदायक इतिहास या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल, अशी भावना अभिनेते कमलेश सावंत यांनी व्यक्त केली.


या चित्रपटात आशुतोष पत्की
, ऋतुजा बागवे, निशिगंधा वाड, माधवी जुवेकर, अरुण नलावडे, गणेश यादव, पंकज विष्णू, मिलिंद दस्ताने, सिद्धेश्वर झाडबुके, श्रीरंग देशमुख, अभय राणे, परेश हिंदुराव, प्राजक्ता दिघे आदींच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.


स्वरजाई आर्ट मीडिया प्रॉडक्शनच्या प्रवीण दत्तात्रेय पाटील यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे तर
सिद्धेश एकनाथ देसले, सागर श्याम हिंदुराव चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. एकनाथ देसले आणि पराग सावंत यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, कथा पटकथा संवाद आणि गीते एकनाथ देसले यांनी लिहिली आहेत. शहीद भाई कोतवाल हा चित्रपट २४ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.








@@AUTHORINFO_V1@@