आता चीनच्या हालचालींवर असेल भारताची 'नजर'

20 Jan 2020 15:42:40


asf_1  H x W: 0

 

नवी दिल्ली : बंगालची खाडी आणि हिंदी महासागर क्षेत्राचा भाग हा भारतासाठी महत्वाचा मानला जातो. अलीकडे या भागामध्ये चिनी नौदलाच्या हालचाली मोठया प्रमाणात वाढल्या आहेत. यावर वाचक बसवण्यासाठी आता भारताकडून पाऊले उचलली गेली आहेत. तामिळनाडूतील तंजावर एअर बेसवर भारतीय हवाई दलाकडून सुपसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेली सुखोई-३० एमकेआयची स्क्वाड्रन तैनात करणार आहे.

 

सुखोई-३० हे खास नौदलासाठी विकसित केलेले विमान नाही. पण या फायटर जेटवर समुद्रातील टार्गेटसना लक्ष्य करण्याची जबाबदारी असेल. ब्रह्मोसमुळे सुखोईची हल्ला करण्याची क्षमत कैकपटीने वाढली आहे असे भारतीय हवाई दलाचे प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी सांगितले. सुखोई आणि ब्रह्मोस एकत्र आल्यामुळे एअर फोर्सला दूर अंतरावरुनच समुद्र किंवा जमिनीवरील कुठल्याही लक्ष्यावर अचूक प्रहार करण्याची क्षमता प्राप्त करुन देण्याचे आमचे स्वप्न पूर्ण झाले आहे असे ब्रह्मोस प्रकल्पाचे महासंचालक सुधीर मिश्रा म्हणाले.

Powered By Sangraha 9.0