तुम्ही पाहिलीत का ‘बिग बीं’ची अनोखी झलक...

    दिनांक  20-Jan-2020 14:07:48
|

zund_1  H x W:बहुचर्चित ‘झुंड’ची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला...

मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा बहुचर्चित पहिला-वहिला हिंदी चित्रपट आणि अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असणारा झुंडया चित्रपटाचा फर्स्ट लूक सोमवारी प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाचे अतिशय दमदार असे हे पहिले पोस्टर कलाविश्वात अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.


चित्रपटाच्या पोस्टवर नागराज पोपटराव मंजुळे असे नाव लिहिण्यात आले आहे. ज्याच्या मध्यभागी अमिताभ बच्चन हे पाठमोरे उभे असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाशी ही दोन तगडी नावे जोडल्यामुळे आता प्रेक्षक आणि एकंदरच कलाविश्वाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये बिग बी हे एका झोपडपट्टीवजा वस्तीजवळील मैदानात उभे दिसत आहेत. तिथेच एक फुटबॉलही दिसत आहे. स्लम सॉकरची सुरुवात करणाऱ्या विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे.


अमिताभ बच्चन या चित्रपटामध्ये एका फुटबॉल प्रशिक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. विजय बारसे
यांनी रस्त्यावरील मुलांमध्ये फुटबॉल या खेळाप्रतीची ओढ निर्माण केली. नागराज मंजुळे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच कलाविश्वातील महानायकासोबत काम करत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून नागराज मंजुळे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.