शाहीन बागेतल्यांचा चेहरा हिंदूविरोधीच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0

 


"आम्ही हिंदूंसोबत राहू शकत नाही, मुस्लिमांना वेगळे राष्ट्र हवे," असे म्हणणाऱ्या, देशाचे तुकडे करणाऱ्या जिनांचेच आपण वारस असल्याचे या महिला व आंदोलकांनी दाखवून दिले. म्हणूनच शाहीन बागेतील महिलांचे आंदोलन सुधारित नागरिकत्व कायदा वा राष्ट्रीय नागरिक नोंदवहीला विरोधासाठीचे नसून हिंदूंपासून (पक्षी भारतापासून) 'आझादी'साठी असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


शाहीन बागेतील मुस्लीम महिलांच्या सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधी आंदोलनामुळे देशातील छद्म धर्मनिरपेक्षतावादी, कथित मानवाधिकारवादी प्रवृत्ती भलत्याच चेकाळल्याचे दिसते. 'मोदी सरकारविरोधात मुस्लीम महिलांचा एल्गार, बुलंद आवाज' वगैरे वगैरे विशेषणे लावून डाव्यांच्या विघातक विचारांवर पोसलेले मेंदू या महिलांना 'वाघिणी' वगैरेही ठरवताना पाहायला मिळते. परंतु, आपल्या पुरोगामित्वाचे गोडवे गाणाऱ्यांनी अशा महिला धर्माच्या नावाखाली शौहरकडून होणारा अन्याय-अत्याचार सहन करत असताना का कधी पुढे आल्या नाहीत? असा सवाल विचारल्याचे बिलकुल स्मरत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इस्लामची चिकित्सा करताना तत्काळ तिहेरी तलाकला, बुरखा पद्धतीला केलेला विरोध आज संविधानाचे दाखले देत शाहीन बागेतील महिलांना पाठिंबा देणाऱ्यांना आठवत नाही. काँग्रेस, डावे व समाजवादी, तसेच देशातल्या पुरोगामी, बुद्धीजीवी, विचारवंतांच्या इस्लाम धर्मानुयायांच्या लांगूलचालनाचा आणि दुटप्पीपणाचा हा पुरावाच नव्हे काय? अर्थात, आपल्या मतपेट्या सांभाळण्यासाठी मुस्लिमांना १४०० वर्षांपूर्वीच्या जगात डांबून ठेवण्यातच या सर्वांचे हित सामावलेले आहे, त्यामुळे ते तसेच वागतात. उल्लेखनीय म्हणजे, मुस्लीम महिला असो वा तरुण-पुरुषदेखील आपल्या अडाणीपणाला नव्या माहितीची, नव्या जगाची कल्हई करण्याऐवजी स्वतःच्या मागासलेपणाला कारणीभूत ठरणाऱ्यांच्याच मागे पळतात, ही आणखी दुर्दैवाची गोष्ट! आताचे शाहीन बागेतील मुस्लीम महिलांचे आंदोलनदेखील कोणतीही गोष्ट समजून-उमजून न घेता गुराख्याच्या मागे धावणाऱ्या मेंढरांहून निराळे नाहीच. तथापि, काँग्रेसी, डाव्या व समाजवादी वर्तुळातल्या धेंडांचा या सगळ्या प्रकारातून अराजक माजवण्याचा उद्देश लपून राहिलेला नाही. कारण, तसे झाले तरच त्यांचे नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजप आणि रा. स्व. संघाच्या नावावर ऊर बडवून घेण्याचे काम साधणार ना!

 

दरम्यान, रविवारी शाहीन बागेतील आंदोलकांनी आणि त्यांच्या पाठीराख्यांनी आपला मुखवट्यामागचा भीषण चेहरा व्यवस्थित दाखवला. एरवी धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा झोडणाऱ्यांनी तिथे आलेल्या काश्मिरी हिंदू पंडितांना हाकलून लावण्यासाठी हात उचलले. शाहीन बागेतील महिला न्यायाची (?) मागणी करत आहेत, तर आपणही आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात न्याय मागून पाहूया, असा विचार करत काश्मिरी पंडित या महिलांसमोर आले. पण, पंडितांनी न्यायाची मागणी करताच इतक्या काळापासून स्वतःवर अन्याय झाल्याचे तारस्वरात किंचाळणाऱ्या महिला व सहकारी पुरुषांनी त्या पंडितांवरच अन्याय केला. काश्मिरी हिंदूंच्या 'न्याय द्या'च्या घोषणांनी नाराज झालेल्या मुस्लीम जमावाने त्यांना हाणामारी करायला सुरुवात केली. विशेष म्हणजे, ही मारामारी केवळ एक घटना होती, शाहीन बागेतील अन्यायग्रस्त (?) महिला व आंदोलकांनी पंडितांवर अन्यायाचा आनंद साजरा करणारा कार्यक्रमही त्याच रात्री करण्याचे ठरवले होते. १९ जानेवारी, १९९० रोजी म्हणजे बरोबर ३० वर्षांपूर्वी काश्मिरातील धर्मांध मुसलमानांनी, जिहादी-फुटीरतावादी तत्त्वांनी खोऱ्यातील लाखो पंडितांना तिथून हालहाल करून पिटाळले होते. त्याच्या 'याद'मध्ये शाहीन बागेत 'जश्न-ए-शाहीन'चे आयोजन करण्यात आले होते. इतरांवर झालेल्या अन्यायाचे अशाप्रकारे 'सेलिब्रेशन' करणाऱ्यांची मानसिकता कशी असेल, त्याचा अंदाज यावरूनच लावता येतो. पण, तरीही मुस्लिमांचा पुळका येणाऱ्या बुद्धीमंत-अभ्यासक आणि राजनेत्यांना काश्मिरी पंडित कधीही 'पीडित' वाटत नाही, उलट अशी अन्यायी वृत्ती जोपासणारेच 'शोषित', 'मासूम', 'निरागस' वगैरे वाटतात. 36 की ३७ दिवसांपासून शाहीन बागेत ठाण मांडून बसलेल्या मुस्लीम महिलांच्या आंदोलनाचे कौतुक वाटणाऱ्यांना तिथूनच जवळपास वर्षानुवर्षांपासून निर्वासितांचे, शरणार्थींचे जीवन कंठणाऱ्या हिंदू पंडितांचा, महिलांचा, मुलींचा टाहो कधीच ऐकू जात नाही. हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले, क्रौर्याची परिसीमा गाठली तरी तो दाखवायचा नाही, त्यावर 'ब्र'ही काढायचा नाही आणि ज्याचा मुस्लिमांशी संबंधच नाही, त्या सुधारित नागरिकत्व कायद्यावरून बोंबा मारायच्या, असला हा कारभार! मात्र, हे सगळेच देशातली जनता पाहते आहे आणि त्यामुळेच काँग्रेससह डाव्यांचा पायाही खणून काढत आहे.

 

दुसरीकडे शाहीन बागेतील महिलांना आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहेच, पण त्या जर देशाच्या एकता-अखंडतेविरोधात भूमिका घेत असतील, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईही झालीच पाहिजे. कारण देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती वगळून शाहीन बागेत देशविरोधाची, हिंदूविरोधाची सगळीच थेरे चालू असल्याचेही उघड झाले. फैज अहमद फैजच्या ज्या नज्मवरून गोंधळ उडाला ती 'हम देखेंगे' शीर्षकाची नज्म इथल्या कित्येक बॅनर्सवर लावलेली आढळली. इतकेच नव्हे, तर इस्लामी वर्चस्वाची आणि हिंदूंबद्दलच्या घृणेची भावना कशाप्रकारे रुजलेली आहे, त्याचे दर्शनही इथे घडले. बुरखा घालून कपाळी गंध-टिकली लावलेल्या तीन महिलांचे व विघटित स्वस्तिकाचे रेखाचित्र, जमलेला घोळका हिंदू महिलांकडे कोणत्या घाणेरड्या मानसिकतेने पाहतो, ते दाखवणारेच होते. खोऱ्यातील काश्मिरी हिंदू पंडितांतील पुरुषांना ज्याप्रकारे हुसकावून लावले, मारून टाकले आणि त्यांच्या मुली-महिला आपल्या वासनेसाठी वापरल्या, तसेच आम्ही अजूनही करू इच्छितो, हेच या चित्रातून स्पष्ट होत होते. इतकेच नव्हे तर इस्लामी-मुसलमानी-धार्मिक, हिंदूविरोधी नारे आणि गृहयुद्धाच्या धमक्याही शाहीन बागेतून देण्यात आल्या. ३० वर्षांपूर्वी काश्मिरी पंडितांना पिटाळताना दिल्या गेलेल्या 'रलिव, गलिव आणि चलिव' म्हणजेच 'इस्लाम कबूल करा, मरा वा पळा'ची आठवण करून देणाऱ्या 'हमें चाहिए जिन्नावाली आझादी' आणि 'ला इलाहा इल्लल्लाह' म्हणजेच 'अल्लाहशिवाय कोणताही ईश्वर नाही'चे नारे इथे दिले गेले. "आम्ही हिंदूंसोबत राहू शकत नाही, मुस्लिमांना वेगळे राष्ट्र हवे," असे म्हणणाऱ्या, देशाचे तुकडे करणाऱ्या जिनांचेच आपण वारस असल्याचे या महिला व आंदोलकांनी दाखवून दिले. म्हणूनच शाहीन बागेतील महिलांचे आंदोलन सुधारित नागरिकत्व कायदा वा राष्ट्रीय नागरिक नोंदवहीला विरोधासाठीचे नसून हिंदूंपासून (पक्षी भारतापासून) 'आझादी'साठी असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सोबतच ३० वर्षांपूर्वी असल्याच 'आझादी'ची साद ज्याप्रमाणे पाकिस्तानातून आली होती, तशीच ती याहीवेळी आलीच असेल. कारण, सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदवहीला विरोध करणाऱ्यांना मिरवण्याचा ठेका पाकिस्तानातील अनेकांनी घेतल्याचे गेल्या काही काळात दिसले. मात्र, देशात सध्या नव्वदच्या दशकातले नेभळट सरकार नाही, तर १३० कोटी भारतीयांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या मोदी-शाहांच्या हातात देश आहे. त्यामुळेच शाहीन बाग असो वा जेएनयु, तिथे दिल्या गेलेल्या देशापासून फुटून निघण्याच्या, आझादीच्या प्रत्येक नाऱ्याला गाडले जाईल, याची खात्री वाटते.

@@AUTHORINFO_V1@@