विद्यार्थी संघटना ते भाजप अध्यक्ष : एक प्रवास

    दिनांक  20-Jan-2020 13:01:48
4 _1  H x W: 0हिमाचल या पूर्वोत्तर राज्याच्या राजकारणातून पुढे आलेले व्यक्तीमत्व अशी ओळख असणारे जगत प्रकाश नड्डा यांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली. देशातील सर्वात मोठा पक्ष अशी ओळख असलेल्या भारतीय जनता पक्षाचे ते ११ वे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले.4 _3  H x W: 0


१९९३मध्ये विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर पहिल्यांदा त्यांची विधीमंडळ नेतेपदी निवड झाली होती. मुख्यमंत्री बनण्याची त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.  मात्र, यानंतर २००९मध्ये ते दिल्लीच्या राजकारणात सक्रीय झाले. प्रदीर्घ संघर्षानंतर ते इथवर पोहोचू शकले आहेत. गतवर्षी लोकसभा निवडणूकांनंतर त्यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.

4 _1  H x W: 0

 

 
 

१९७७ ते १९७९ पर्यंत ते रांचींमध्ये राहीले होते. त्यांचे वडिल रांची विद्यापीठात कुलपती होते. १९७५ मध्ये आंदोलनातून ते लोकांच्या नजरेत आले. यानंतर त्यांनी अभाविपमध्ये सक्रीय सहभाग घेतला.4 _1  H x W: 0

 

 
 

विद्यार्थी संघटनेच्या निवडणूकीत ते पहिल्यांदा सचिव बनले होते. त्यांचे शिक्षण एलएलबीपर्यंत झाले आहे. १९८३ मध्ये ते पहिल्यांदा ते हिमाचल प्रदेश विद्यापीठात अभाविपचे अध्यक्ष बनले होते.

 
 

वडिलांचे नाव - डॉ. नारायणलाल नड्डा

आईचे नाव - कृष्णा नड्डा

जन्म - २ डिसेंबर १९६०, पटणा

पत्नी - डॉ. मल्लिका नड्डा

परिवार - हरिश आणि गिरीश नड्डा ही दोन मुले

शिक्षण - बीएए, एलएलबी