स्वदेशी के-४ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2020
Total Views |

india_1  H x W:

 

भारत ठरला जमीन, हवा आणि पाण्यातून परमाणू क्षेपणास्त्राचा मारा करणारा सहावा देश!


नवी दिल्ली : स्वदेशी निर्मित के-४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी रविवारी सांयकाळी भारताकडून करण्यात आली. गेल्या दोन वर्षापासून यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. जवळपास ३५०० किलोमीटर दूर पर्यंत मारा करणारे हे क्षेपणास्त्र असून, २००० किलोंचे शस्त्र घेऊन जाण्याची त्याची क्षमता आहे. १२ मीटर लांब असलेले हे क्षेपणास्त्र १.३ मीटर गोलाकार आहे. १७ टन वजन असलेल्या या क्षेपणास्त्राची २० मीटर खोल पाण्यात हल्ला करण्याची क्षमता आहे. या यशस्वी चाचणीनंतर भारतीय लष्कर पाणबुडीमधून शत्रूंच्या ठिकाणावर लक्ष्य भेदण्यासाठी आणखी मजबूत झाली आहे.


के-४ क्षेपणास्त्र पाणबुडीची चाचणी रविवारी आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर करण्यात आली. समुद्राच्या पाण्यातून ही यशस्वी चाचणी करण्यात आली. स्वदेशात विकसित करण्यात आलेल्या दोन क्षेपणास्त्रांपैकी ही एक आहे. के-४ शिवाय दुसरे क्षेपणास्त्र बिओ-५ आहे. याची डागण्याची क्षमता जवळपास ७०० किलोमीटर आहे. हे क्षेपणास्त्र डीआरडीओने विकसित केले आहे. स्वदेशी निर्मित अरिहंत क्लासची परमाणू पाणबुडी भारताच्या ताफ्यात असून, अजून एका पाबुडीचा समावेश करण्यात येणार आहे. जमीन, हवा आणि पाण्यातून परमाणू क्षेपणास्त्राचा मारा करण्याची क्षमता ठेवणारा भारत जगातील सहावा देश ठरला आहे. अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन आणि चीन या देशांसह भारताचा यात समावेश झाला आहे.

@@AUTHORINFO_V1@@