आयुष्मानचा पुन्हा बोलबाला...

    दिनांक  20-Jan-2020 16:53:45
|

aayushman_1  Hआयुष्मान पुन्हा दिसणार एका हटके भूमिकेत!


मुंबई : बॉलिवूडमध्ये सलग सात सुपरहिट चित्रपट देणारा आयुष्मान खुराना पुन्हा एका हटके भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. आयुष्मानचा आगामी चित्रपट ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोमवारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाच्या नावावरून याची नेमकी कथा काय असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होतीच. आणि पोस्टरवरून हा चित्रपट एक सामाजिक संदेश देणारा असेल याचा अंदाज प्रेक्षकांनी बांधला होता. या चित्रपटात आयुष्मान खुराना पहिल्यांदा समलैंगिक मुलाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

ट्रेलर प्रदर्शित करण्यापूर्वी आयुष्मानने चित्रपटाचे काही पोस्टर प्रदर्शित केले होते. या पोस्टरला कॅप्शन देताना त्याने लिहिले की, 'कार्तिक का प्यार होकर रहेगा अमन! ' नवीन पोस्टरमध्ये चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट दिसते. या चित्रपटात आयुष्मानसह नीना गुप्ता, गजराज राव, जितेंद्र कुमार, मनुऋषि चड्ढा, सुनीता रजवार, मानवी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या २१ फेब्रुवारीला हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.