हे तर महा ‘भकास’ आघाडी सरकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2020
Total Views |
Mahavikas Aghadi _1 



५० दिवसांच्या कामावर भाजपची टीका





मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून एकत्र येत स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या ५० दिवसांच्या कामकाजावर विरोधी पक्ष भाजपने रविवारी कडाडून टीका केली. हे महा ‘विकास’ नाही तर महा ‘भकास’ सरकार असल्याचे पोस्टर भाजपच्या वतीने रविवारी समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आले. यावेळी भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडी सरकारचे ५० दिवस म्हणजे ’बिनकामाची पन्नाशी’ असा टोमणाही लगावला.





मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर रविवारी ५० दिवस पूर्ण झाले. याचे औचित्य साधत भाजपच्या वतीने रविवारी समाजमाध्यमांवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये तुलना करण्यात आली. फडणवीस सरकारविरुद्ध ’महाभकास आघाडी सरकार’ असे शीर्षक भाजपकडून प्रसिद्ध करण्यात आले असून कर्जमाफी, जलयुक्त शिवार, शेतकरी धोरण, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाला मंजुरी, नवी मुंबईतील विमानतळ आरक्षणाचे प्रलंबित प्रश्न, यांसह अनेक निर्णयांचा पाढा वाचला आहे.





तर दुसर्‍या बाजूलाबिनकामाची पन्नाशीअसे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या गेल्या ५० दिवसांतील ‘भकास’ आघाडी सरकारवर टीका केली आहे. यात फसव्या कर्जमाफी, सातबारा कोरा झालाच नाही. मंत्र्यांची दालने खाते यावरच केवळ बैठका, प्रशासनात सुस्ती, मलाईदार खात्यांसाठी रस्सीखेच, भाजपला दूर ठेवण्यासाठी गतिमान विकास थांबून स्वतःचे खिसे गरम करण्यासाठी हे महाभकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. अशा तिखट शब्दांत ठाकरे सरकारवर टीका करण्यात आली आहे.



@@AUTHORINFO_V1@@