जम्मूमध्ये हिजबुल मुजाहिदीनच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा

20 Jan 2020 15:17:59


asf_1  H x W: 0


नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मिरमधील शोपियन जिल्ह्यामध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. हे तीनही दहशतवादी हिजबुल मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेचे सदस्य असल्याची माहिती देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शोपिअन जिल्ह्यातील वाच्ची भागामध्ये आणखी शोधमोहीम सुरू आहे.

 

याप्रकारामुळे पुन्हा एकदा भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या मनसुब्यांवर आघात केला आहे. या भागामध्ये आणखी काही दहशतवादी लपले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांना समर्पित होण्यास सांगण्यात आले होते, मात्र त्यांनी लष्करावर गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्यामुळे लष्करानेही त्याला प्रत्युत्तर देत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यामधील एका दहशतवाद्याची ओळख पटली आहे. त्याचे नाव आदिल एहमद आहे. त्याने २०१८ मध्ये पोलीस दलाचा त्याग केला होता. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

Powered By Sangraha 9.0