राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेतकऱ्याचे नुकसान

02 Jan 2020 10:01:12


saf_1  H x W: 0


मुंबई : राज्याच्या अनेक भागात गुरुवारी अवकाळी पाऊस पडला. यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. कापूस, तूर, हरभरा पिकांवरही पावसाचा परिणाम झाला आहे. तसेच, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. सलग ५ दिवस ढगाळ वातावरण होते. नागपूर जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून पाऊस कोसळत होता. काटोल, नरखेड ग्रामीण भागात काही ठिकाणी गारपीट झाली.

 

मुंबईमध्ये धुक्यांची चादर

 

एकीकडे संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने हैदोस घातला होता, तर दुसरीकडे मुंबईमध्ये धुक्यांची चादर पसरली होती. मुंबईच्या तापमानात आणखी घट झाली आहे. मुंबईमधील तापमान आता १५ अंश सेल्सियस एवढी नोंद करण्यात आली. तर, नाशिकमध्ये सर्वात कमी १०.३ अंश सेल्सियस एवढे तापमान होते. पुढील दोन दिवसांमध्ये मुंबईच्या तापमानामध्ये आणखी घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Powered By Sangraha 9.0