हिंदू शरणार्थीने जिंकली व्यवस्थेविरोधातील लढाई

02 Jan 2020 15:47:24
Kohali _1  H x


राजस्थान सरकारने दिली विद्यार्थीनीला परिक्षा देण्याची परवानगी

नवी दिल्ली : पाकिस्तानातून हिंदू शरणार्थी मुलीला राजस्थान सरकारने परिक्षेला बसण्यास नकार दिल्याने वाद उफाळून आला होता. मात्र, या तिने याविरोधात आवाज उठवल्यानंतर तिला परवानगी देण्यात आली आहे. दमी कोहली या विद्यार्थीनीने राज्य शिक्षण मंडळाने बारावीच्या परिक्षेचा अर्ज भरण्यास नकार दिला. सर्व प्रमाणपत्र सादर केल्यानंतरही तिचा अर्ज स्वीकारला गेला नाही.

 

दमी कोहली काही वर्षांपूर्वी आपल्या परिवारासोबत पाकच्या सिंध प्रांतातून भारतात आली. धार्मिक हिंसाचारामुळे तिने पाकिस्तान सोडला होता. तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण पाकिस्तानत झाले आहे. सध्या ती आणि तिचे कुटूंबिय जोधपूरच्या आंगनवा रिफ्यूजी कॅम्पमध्ये राहतात. २०१८मध्ये तिने अकरावीत प्रवेश घेतला होता. अकरावीत उत्तीर्ण झाल्यानंतर तिने रितसर बारावीच्या वर्षासाठी अर्ज केला. त्यावेळी तिला बोर्डाने नोटीस पाठवत ती या परिक्षेसाठी पात्र नसल्याचे सांगण्यात आले.

 

हे प्रकरण गाजल्यानंतर राजस्थान सरकारला जाग आली. शिक्षणमंत्री गोविंद डोतासरा यांनी याबद्दल माहिती मागवली. पाकिस्तानी दुतावासाकडे पत्र लिहून दमी हिच्या अभ्यासक्रमाची माहिती मागवून घेतली आहे. राजस्थान आणि पाकिस्तानातील अभ्यासक्रमाची तपासणी आम्ही करत आहोत, अशी माहिती डोतासरा यांनी दिली आहे. जर पाकिस्तानातून सकारात्मक प्रतिसाद आला तर तिला परिक्षा देण्यासाठी परवानगी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.



Powered By Sangraha 9.0